बघता बघता ४ फेब्रुवारी ला १३ वर्षांचे झाले फेसबुक! फेसबुक आणि WhatsApp ने हाकेच्या अंतरावर आणलेल्या या सोशिअल युगामध्ये जुन्या आणि नवीन दोन्हीही पिढ्यांना खिळवून ठेवलंय.

मोबाईल मध्ये एकदा का फेसबुक चं नीळ App उघडलं आणि नवीन अपडेट बघत खाली यायला सुरुवात केली कि थांबवासे हि वाटत नाही आणि कंटाळा तर नाहीच नाही.
मग पुढे जाऊन तो लाल रंगांचा झालेला Notifications चा Icon! WhatsApp वर सुद्धा आपला ताबा मिळवून Facebook ने सर्वांभोवती एक सोशिअल वलय तयार केलं आहे.

एकंदरीत या सगळ्या ओढातानिमध्ये पुस्तक वाचन आणि मैदानी खेळ यांचा नामशेष नक्कीच होतोय. कोण्या एका व्यक्तीने Internet चा शोध लागण्यापूर्वी एक विधान केलं होत कि, “इंटरनेट मुले लोकांचा वेळ वाचेल!”.
या व्यक्तीचे हे मत कितपत खरे घडत आहे, आपले काय मत आहे?

नियतीने सतार प्रत्येकाच्या हाती दिली आहे. पण या सतारीमधून हवे तसे निनाद काढणारे कुशल वादक फार थोडे असतात.

काही दिवसांपूर्वी माझा एक जुना मित्र संगमनेर मध्ये आला होता, फेसबुक ने लगेच मला कळवले कि, “Sandeep Shirsath is nearby you.”. मी कॉल करून बघितला आणि चकित झालो, कारण तो खरोखर संगमनेर मध्ये आलेला होता.

या फेसबुक ची सुरुवात झाली तेव्हापासुन फेसबुक चा संस्थापक मार्क झुकेरबर्ग ने नवनवीन कल्पना अमलात आणल्या आणि अद्वितीय सुविधा देण्याचा कायम प्रयत्न केला.
एक किमयागार म्हणून या व्यक्तीला मानतो मी.

फक्त मित्र आणि मेसेज या व्यतिरिक्त हि फेसबुक ने खूप साऱ्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत, कि ज्यांचा आज मितीस लाखो कंपन्या त्यांच्या व्यवसाय वृध्दीसाठी तसेच राज्यकर्ते त्यांच्या प्रचारासाठी वापरताना दिसून येतात.

आपला छोटा व्यवसाय फक्त आपल्या शहरामधील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असो किंवा एखाद्या कार्यक्रमाचं आमंत्रण असो, सर्व काही फेसबुक ने सोपं केलं आहे.

खरोखर या सतारीपासून हवे तसे निनाद काढणारे कुशल वादक बनायला पाहिजे, फक्त वेळ वाया न घालवता आपल्या व्यवसायासाठी किंवा महत्वाच्या कामांसाठी फेसबुक कसे वापरता येईल, या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे.

एखाद्या व्यावसायिकाने वैतागल्यामुळे फेसबुक वरील आपले खाते बंद करणे किंवा खातेच नसणे, हि एक पळवाट आहे अस म्हणावं लागेल.

विद्यार्थी, व्यावसायिक, राज्यकर्ते, गृहिणी, शिक्षक या सर्वांसाठी फेसबुक किंवा इतर सोशिअल वेबसाईट योग्यच आहे.
अशा या १३ वर्षाच्या बालकास वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन थांबतो.

-अमित कदम,
Director of FLYMIT Infotech Pvt. Ltd.
9552015542.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *